Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात अक्कलकुवा तालुक्यातील दोन तर शहादा तालुक्यातील एका युवक युवक ठार

Mahesh Patil by Mahesh Patil
September 23, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात  तीन वेगवेगळ्या अपघातात तीन युवक ठार झाल्याची घटना घडल्या आहेत. यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील दोन तर शहादा तालुक्यातील एका युवकाचा समावेश आहे.याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील मलोणी रस्त्यावरील मरिमाता मंदिराजवळून अज्ञात वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले. यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकी(क्र.एम.एच.३९ के ४३२५) ला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील संदिप उर्फ सुनिल चंद्रसिंग बारी (पावरा) (वय २८)  रा.कृष्णनगर, लोणखेडा ता.शहादा यास गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान संदिप बारी याचा मृत्यू झाला. वाहन चालक मात्र दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. याबाबत मुकेश भिमसिंग पावरा रा.दुधखेडा ता.शहादा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी  पुढील तपास पोहेकॉ.अशोक कोळी करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत दि.२० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीपाटी येथील रोहित पारता पाडवी (वय १८) व मोगऱ्या मिऱ्या वसावे (वय १९ ) रा.मोलगी ता.अक्कलकुवा हे दोघेजण दुचाकी (क्र.एम.एच.३९ एई ६८१६) घेवून  जात होते. रोहित पाडवी याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने अपघात घडला. यात मोगऱ्या मिऱ्या वसावे यास गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला. तर रोहित पाडवी यास दुखापत झाली आहे. सदरच्या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत मिऱ्या इऱ्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन दुचाकीचालक रोहित पाडवी याच्याविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महाले करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत अक्कलकुुवा तालुक्यातील मोलगी-काठी रस्त्यावर दि.२० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बोलेरो वाहन (क्र.एम.एच. ३९/८८५) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविले. यामुळे पारशी वळवी यांच्या घराजवळून जात असतांना समोरुन येणाऱ्या ॲपेरिक्षा (क्र.जी.जे.१५ एक्स ९०८३) ला धडक दिली. अपघातात रिक्षात बसलेले लक्ष्मण दोहऱ्या वसावे (वय २७, रा.काठीचा पाटीलपाडा) हे रिक्षातून बाहेर फेकले गेल्याने गंभीर दुखापती झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत काठी पाटीलपाडा येथील दीपक दोहऱ्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन चारचाकी वाहन चालकाविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.बुनकर करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

उपक्रमशील शाळेला विशेष कार्यकारी अधिकारी यांची सदिच्छा भेट

Next Post

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेत डल्ला मारणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली मुद्देमालासह काही तासातच अटक, न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेत डल्ला मारणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली मुद्देमालासह काही तासातच अटक, न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

May 15, 2025
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

May 15, 2025
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

May 15, 2025
प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

May 15, 2025
१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

May 15, 2025
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

May 14, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group