नंदुरबार | प्रतिनिधी
प्रत्येक व्यक्तीला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी वधु वर सूचक मेळावा हे व्यासपीठ मराठा पाटील समाज मंडळ तर्फे उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून प्रथमच असा उपक्रम समाजातर्फे घेण्यात आला. त्यात सुमारे १३७ वधू-वरांनी परिचय करून दिला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य बी एस पाटील यांनी दिली आहे.
येथील मराठा पाटील समाज मंडळातर्फे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयात आज वधु वर सूचक व पालक मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.पाटील हे होते.तर मेळाव्याचे उद्घाटन सचिव यशवंतराव पाटील यांनी केले यावेळी विश्वास पाटील, शालिग्राम पाटील, माजी नगरसेवक कैलास पाटील, आर डी मोरे, मधुकर पाटील, निंबाजीराव बागुल, व्ही एम अहिरराव, हे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ बी एस पाटील यांनी सांगितले की,बदलत्या काळाप्रमाणे समाजातील घटकांनी बदल घडविणे गरजेचे आहे कमी वेळात एकाच व्यासपीठावर वधू-वरांचा परिचय झाला असून समाज मंडळाच्या हा पहिलाच उपक्रम आहे यापुढे यात आणखीन सुधारणा करून भविष्यात या उपक्रमाला मोठे स्वरूप प्राप्त होईल. वधू-वरांच्या परिचयाची पुस्तिका देखील तयार करण्यात येणार असल्याची माहिती श्री .पाटील यांनी दिली.
मेळावा संयोजनासाठी रोहिदास जाधव, मधुकर पाटील, एस.एन. पाटील, आर.बी. पाटील,मनोज पवार,राजेंद्र बागुल, पी.एस.पाटील, रमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक निंबाजीराव बागुल यांनी केले . सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश निकुंबे यांनी केले.