Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पात्रता नसलेल्या अधिकार्‍यांना नियुक्त्या देण्यामागे गौडबंगाल काय ? जि.प.सदस्य भरत गावीत यांचा संतप्त सवाल

team by team
February 2, 2023
in राजकीय
0
पात्रता नसलेल्या अधिकार्‍यांना नियुक्त्या देण्यामागे गौडबंगाल काय ? जि.प.सदस्य भरत गावीत यांचा संतप्त सवाल

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषदेत रिक्तपदे आहेत. यात सक्षम अधिकारी असतांना त्याठिकाणी पात्रता नसलेल्या अधिकार्‍यांना नियुक्त्या देण्यामागील गौडबंगाल काय आहे. असा सवाल करत शिक्षण विभागाचा कारभारावर जि.प.सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत ताशेरे ओढले. त्यामुळे बैठकीत वातावरण तपले होते.

 

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात स्थायी समितीची सभा जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जि.पं.मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगिता गावीत, शिक्षण व अर्थसमिती सभापती गणेश पराडके, बांधकाम सभापती शंकर पाडवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रमोदकुमार पवार आदी उपस्थित होते.

 

 

यावेळी सुरूवातीला शासन निर्णय परीपत्रके वाचन करण्यात आली. दरम्यान जि.प.सदस्य राया मावची यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्माशानभुमी नसलेल्या ठिकाणी स्मशानभुमी तयार करण्याची मागणी केली. तसेच पदवीधर, आमदारांच्या धर्तीवर सरपंच, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांच्याही आमदार निवडण्यात यावा. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे सुचना केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, वर्ग दोनचे सक्षम अधिकारी असतांना त्यांना डावलून गटशिक्षणाधिकारीपदी कोणालाही पदभार देण्यात येतो. त्याबाबत त्यांच्यासह जि.प.सदस्या एश्‍वर्या रावल यांनी आक्षेप घेतला.

 

 

शिक्षण विभागासोबतच महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेसाठी प्रभावी अधिकारी म्हणून श्री.सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर अनेक तक्रारी असतांना पद्भार कुठल्या अनुषंगाने दिला जातो. असा सवाल जि.प.सदस्य भरत गावीत यांनी उपस्थित करत सक्षम अधिकारी असतील त्यांच्याकडे पद्भार देण्यात यावा. याची मागणी केली. त्यासोबत कुठल्या विभागात पदभार देतांना कुठले नियम लावले आहेत. याची लेखी मागणी केली. जिल्हा परिषदेत अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे पादत्रता नसलेल्या लोकांना नियुक्त्या दिल्या जात असल्याबाबत जि.प.सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

यावेळी जि.प.सदस्या एश्‍वर्या रावल यांनी ७ ते ८ वर्षापासून सारंगखेडा आरोग्य केंद्रात डॉक्टरांची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापर्यंत त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. ३० गावांचा संपर्क या आरोग्य केंद्राशी येतो. त्यामुळे येथे एम.बी.एस.डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेतर्ंगत २०२१-२२ मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे अद्यापही रजिस्टेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाने ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असतांना त्यांचे कामे कसे पूर्ण होतील. असा सवाल जि.प.सदस्यांनी व्यक्त केला. दरम्यान २०२४ पर्यंत मनरेगासाठी जिल्ह्यात १ हजार कोटी मनुष्यबळाचा लक्षांक ठेवण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध विभागाचा आढावा घेण्यात आला.

शासनाला विनंती आहे की, नंदुरबार जिल्हा परिषदेतील रिक्तपदे भरण्यात यावी. ज्यामुळे जिल्ह्यात विकासाला चालना मिळेल तसेच ग्रामीण भागातून आलेल्या नागरीकांचे तक्रारी सोडविण्यास मदत होईल. आज जिल्हा परिषदेत पात्रता नसतांनाही विविध विभागात कर्मचार्‍यांना अधिकारीपदाचा दर्जा दिला जात आहे. त्यातच शिक्षण विभागात मनमानी कारभार सुरू असून अनेक कर्मचारी १० ते १२ वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून आहे. अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी.
भरत गावीत, जि.प.सदस्य

बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक पदवीधर निवडणूकीत चौथ्या फेरी अखेर सत्यजित तांबे विजयाच्या उंबरठ्यावर , कुणाला पडली किती मते ?

Next Post

नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे दणदणीत विजयी

Next Post
नाशिक पदवीधर निवडणूकीत दुसऱ्या फेरी अखेर कुणाला पडली किती मते

नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे दणदणीत विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add