म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शिरूड दिगर केंद्राची शिक्षण परीषद विस्तार अधिकारी श्रीमती एम.के.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व शिरूड दिगर केंद्राचे केंद्रप्रमुख एस.एन.चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बी.डी पाटील माध्यमिक विद्यालय शिरूड दिगर येथे संपन्न झाली.
परीषदेस डायट च्या ज्येष्ठ अधिव्याख्यात्या श्रीमती वनमाला पवार, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शिंदे, केंद्रमुख्याध्यापक सिध्दार्थ बैसाणे यांची उपस्थिती लाभली.
परीषदेची सुरवात ईशस्तवनाने झाली.ईयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यिनींनी स्वागत गीत सादर केले.दिप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून परीषदेची सुरवात करण्यात आली. सुरवातीलाच केंद्रप्रमुख श्री. चौधरी यांनी मागील शिक्षण परीषदेचा मागोवा सादर केला. अधिव्याख्यात्या वनमाला पवार यांनी आपल्या बहूमोल मार्गदर्शनात निपून भारत अंतर्गत माता गट,अध्ययन अभ्यास सर्वेक्षण,विविध लिंक भरणे ई.विषयांना स्पर्श केला.
नंतर वेळापत्रका प्रमाणे पोस्ट नँश श्री.बैसाणे,वर्ग प्रक्रीया व रचना श्री.चितळकर ,पालक परिषद श्री.गुरखा यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात एम. के. पटेल यांनी विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शनासोबत क्रिडास्पर्धेच्या नियोजना संदर्भात माहीती दिली परीषदेचे सुत्रसंचलन ईश्वर मोरे तर अभार प्रदर्शन दिपक निकुंभ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील,श्रीमती सरला पाटील जि .प. शाळेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.








