Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काथर्दे दिगर येथे हजारो भाविकांच्या साक्षीने ओढली बारा गाडी लांगड

team by team
January 8, 2023
in सामाजिक
0
काथर्दे दिगर येथे हजारो भाविकांच्या साक्षीने ओढली बारा गाडी लांगड

म्हसावद l प्रतिनिधी
  येळकोट  येळकोट जय मल्हार च्या जय घोषात, हजारो भाविकांच्या साक्षीने बारा गाडी लांगड ओढून काथर्दे दिगर (ता.शहादा) येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाला जल्लोषात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
      पौष शुध्द पौर्णिमेला काथर्दे दिगर (ता.शहादा) येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाला शुक्रवारी विविध पुजा अर्चा करून सुरवात झाली.तत्पूर्वी रविवारी खंडेराव महाराज मंदिरात तळीभरून गोंधळ, जागर करण्यात आला. तर आदल्या दिवशी गुरूवारी गाव तमाशा सादरीकरण झाले.तब्बल आठवडाभर चालणारा या यात्रोत्सवानिमित्त खेळणी,भांडी,शेती उपयोगी अवजारे,उपहार गृह,पाळणे, मनोरंजनाची साधने आदींसह लहान मोठे शेकडो व्यवसायीकांनी  दुकाने थाटली आहेत.
सोयीसुविधा
      यानिमित्त ग्रामपंचायत प्रशासन व जय मल्हार ट्रस्टतर्फे रस्त्ये, पाणी,पथदिवे,साफसफाई ची कामे करण्यात आली आहे. महिला व पुरुषांना दर्शनासाठी स्वतंत्र बॅरेकेटींग करण्यात आले आहे.सरपंच तथा जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष गुलाबसिंग गिरासे,उपाध्यक्ष निंबा गिरासे,सचिव भिमसिंग गिरासे आदी.सह ग्रामस्थ भाविकांच्या सोयीसुविधांसाठी प्रयत्नशिल आहेत. तर प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष लक्ष ठेवले जात आहे.
लांगड ओढली
       खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी लांगड ओरडण्याचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.खंडेराव महाराजांचे वारे संचारलेले भगत रघुनाथ मिस्तरी कानळदे (ता.नंदूरबार) यांनी बारा गाड्या लांगड कमरेला बांधून ती सुमारे अडीच शे.फुटांपर्यंत ओढून नेली.शेकडो भाविक या बारा गाड्या लांगडीवर बसले होते. याप्रसंगी येळकोट येळकोट जय मल्हार च्या जय घोष,भंडारा ची प्रचंड उधळण,करित भाविकांनी मोठ्या श्रध्देने हा सोहळा नजरेत व आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.त्यानंतर खंडेराव महाराज,महादेव व मारूतीचे मोठ्या भक्ती भावात दर्शन घेतले.या यात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकर्‍यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ,डोकारे कारखान्याची पहिल्या मासिक सभेत  चेअरमन भरत गावित याचे प्रतिपादन

Next Post

शिरूड दिगर येथे केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात

Next Post
शिरूड दिगर येथे केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात

शिरूड दिगर येथे केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add