Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सांगली येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी रवाना

team by team
January 8, 2023
in शैक्षणिक
0
सांगली येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी रवाना
म्हसावद l प्रतिनिधी
सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून आज होणाऱ्या या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच अनेक मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील  शिक्षकेतर कर्मचारी रवाना झाले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले यांनी दिली.
    शिक्षकेतर संघटनेच्या राज्य महामंडळाचे ५० वे (सुवर्ण महोत्सवी) राज्य अधिवेशन सांगली येथील कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे आज ८ जानेवारी २०२३ ला पार पडणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच अनेक मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनामध्ये शिक्षकेतरांचा अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये २०१९ च्या नवीन आकृतीबंधानुसार शिक्षकेतरांची नवीन भरती सुरू करणे, आश्वासित प्रगती योजना म्हणजे १०-२०-३० लागू करणे, शिक्षकेतरांना पदोन्नतीची संधी देणे यांसह शिक्षकेतरांचा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, अध्यक्ष अनिल माने आणि सर्व राज्य पदाधिकारी तसेच सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत.
त्यामुळे या महत्वपूर्ण अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले यांनी केले होते.त्यांच्यासह कार्यवाह सय्यद इसरार, उपाध्यक्ष माधव पाटील, महेंद्र सूर्यवंशी, जुबेर सर, प्रशांत पवार, जयेश वाणी, अमित मराठे, संजय भामरे, प्रदीप चव्हाण, श्री. गाडे, अस्लमभाई, श्री. नरी, निलेश पाटील, योगेश चव्हाण, रामा चव्हाण, श्री. पंचोली, सुनिल वायकर,गुंजन शहा, श्री. ठाकरे, मीना वसावे, के.डी.सावंत हेमंत ठाकरे, आर.एन. सावंत, महादू घुमरे, महेंद्र पाटील ,मधुकर माळी,चंद्रभान राजपूत आदीं कार्यकर्ते सांगली अधिवेशनास रवाना झाले  आहे.
सांगली येथे होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची जोरदार तयारी चालू असून या ऐतिहासिक अधिवेशनात शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्नांना निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु यासाठी सर्वांची उपस्थिती महत्त्वाची असून आपली ताकद व आपली एकजूट दाखवण्यासाठी सगळ्यांनी सांगली अधिवेशनास उपस्थित राहत आहोत असे नंदुरबार  जिल्हाध्यक्ष
डी. पी. महाले यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिरूड दिगर येथे केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत अन्वी लोखंडे जिल्ह्यात प्रथम

Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेत अन्वी लोखंडे जिल्ह्यात प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत अन्वी लोखंडे जिल्ह्यात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add