Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील 11 गावांच्या पाणी पुरवठा योजनांना गती द्या खा.डॉ. हिना गावित यांचे निर्देश

team by team
September 11, 2021
in राज्य
0
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील २ हजार ९१ घरकुलांना मंजुरी, शहरी रहिवाशांना मिळणार हक्काचे घर ; खा.डॉ.हीना गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दुधाळे, होळ तर्फे हवेली, पातोंडा, वाघोदा, रनाळा, शनिमांडळसह 11 गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी खा.डॉ. हिनाताई गावित व आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांसोबत या योजना त्वरीत कार्यान्वित कराव्व्यात, म्हणुन बैठक घेऊन संबंधितांना या योजनांबाबत आवश्यक  त्या सुचना दिल्यात.
या गावांच्या मुळ योजनांचा विहीत कालावधी पुर्ण झाला असुन काही गांवे शहरालगत असल्यामुळे या गावांची लोकसंख्या वाढली आहे. करिता सद्याच्या वाढलेल्या लोकसंख्येला कमी पाणी पुरवठा होत असुन उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत या 11 गावांसाठी त्वरित  प्रत्येक माणसी प्रती दिनी 55 लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी खा.डॉ. हिना गावित यांनी या योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची शासनाकडुन नियुक्ती करवुन 2024 पर्यंत या योजना  पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सारंगखेडा, प्रकाशा, लोणखेडा, खापर, अक्कलकुवा या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा यात समावेश आहे. या योजनांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असुन आराखडे तयार करण्याचा कामाला गती देण्याच्या सुचना खा.डॉ. हिना गावित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील दुधाळे, होळ, पातोंडा, वाघोदा, रनाळा, शनिमांडळ, सारंगखेडा, प्रकाशा, खापर, अक्कलकुवा, लोणखेडा अशा 11 गावांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. म्हणुन या योजना डिसेंबर 2021 पर्यंत कार्यारंभ आदेश होऊन पुर्णत्वास नेण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखुन ग्रामीण जनतेला याचा लाभ व्हावा. यासाठी युध्द पातळीवर काम करावे, असेही खा.डॉ. हिना गावित व आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी संबंधितांना सुचित केले आहे. शहरालगत पडलेले नविन प्लॉट्स, नियोजित वसाहतींना या योजनेत सहभागी करुन त्यांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना खा. डॉ. हिनाताई गावित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीला कार्यकारी अभियंता निकुंभ, उपअभियंता, विविध यंत्रणांचे अधिकारी, रामचंद्र पाटील, हरीभाई पाटी, शरद तांबोळी, जयपाल रावल, शनिमांडळ, तलवाडे, दुधाळे या गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण व शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन योजनांव्दारे मुबलक पाणी मिळावे, यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे ही खा.डॉ. हिना गावित यांनी स्पष्ट केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील अवैध वसूलीची चौकशीची जि. प.सदस्य मधुकर नाईक यांची मागणी

Next Post

नवापूर तालुक्यातील करंजाळी येथे खा. डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते ग्रामस्तरीय बाजारपेठेचे उद्घाटन

Next Post
नवापूर तालुक्यातील करंजाळी येथे खा. डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते ग्रामस्तरीय बाजारपेठेचे उद्घाटन

नवापूर तालुक्यातील करंजाळी येथे खा. डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते ग्रामस्तरीय बाजारपेठेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add