नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार निर्मित रूरल हाट (ग्राम स्तरीय बाजार) लोकार्पण सोहळा नवापूर तालुक्यातील करंजाळी येथे पार पडला. कार्यक्रमाचे उदद्घाटन व लोकार्पण खा. डॉ. हिना गावीत यांनी केले. त्यावेळी त्यांनी रूरल हाट सारख्या नवीन संकल्पना राबविल्याबद्दल नाबार्ड, डॉ. हेडगेवार सेवा समिती व करजळी गावाचे रूरल हाट सारख्या सुंदर वास्तूचे उभारणी गावात झाल्याबदल कौतुक केले.
यावेळी खा.गावीत यांनी रूरल हाटच्या माध्यमातून करंजाळी गावातील शेतकऱ्यांना,महिलांना,विक्रेत्यां ना माल विक्रीस एक ग्रामस्तरीय व्यवस्था निर्माण झाल्याबद्दल विश्वास व्यक्त केला. शहरात न जाता गावातच बाजारपेठ या निमिताने उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पाचं सुयोग्य लाभ घेण्यासाठी आवाहन केले. दर शुक्रवारी करंजाळी गावात आठवडे बाजार या हाट मध्ये भरवला जाईल. असे या वेळी त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षाथांनी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई काशिनाथ पाटील यांनी भूषविले. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक, प्रमोद पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील व नवापूर तालुक्यातील नाबार्ड राबवित असलेल्या विविध प्रकल्पची माहिती दिली. करंजली गावातील हाट पहिलाच ग्रामस्तरीय बाजार हाट असून याचा गावातील तसेच परिसरातील शेतकर्यांना विक्रेत्यांना नक्कीच फायदा होईल व मॉडेल बाजार हाट निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांनी रूरल हाट मुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना मिळून गावाची विकास प्रक्रिया गतिमान होईल असे प्रतिपादन केले. डॉ राजेंद्र दहतोंडे यांनी नाबार्ड व कृषि विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून परिसरातील उभ्या राहिलेल्या विविध कामे व व्यवस्था बद्दल माहिती दिली. रूरल हाटचे गावविकास साठी महत्व याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास डॉ. हेडगेवार सेवा समिती, संचालिका श्रीमती अर्चना वळवी, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, राजेंद्र दहतोंडे, अनिल पाटील, नवापुर पंचायत समिती सदस्य श्रीमती ललिता वळवी, सरपंच किसन वळवी, नवु वळवी, प्रमोद पाटील , कृषी सहायक, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी ग्राम पंचायततर्फे ग्राम स्वच्छता करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.