नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दुधाळे, होळ तर्फे हवेली, पातोंडा, वाघोदा, रनाळा, शनिमांडळसह 11 गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी खा.डॉ. हिनाताई गावित व आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांसोबत या योजना त्वरीत कार्यान्वित कराव्व्यात, म्हणुन बैठक घेऊन संबंधितांना या योजनांबाबत आवश्यक त्या सुचना दिल्यात.
या गावांच्या मुळ योजनांचा विहीत कालावधी पुर्ण झाला असुन काही गांवे शहरालगत असल्यामुळे या गावांची लोकसंख्या वाढली आहे. करिता सद्याच्या वाढलेल्या लोकसंख्येला कमी पाणी पुरवठा होत असुन उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत या 11 गावांसाठी त्वरित प्रत्येक माणसी प्रती दिनी 55 लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी खा.डॉ. हिना गावित यांनी या योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची शासनाकडुन नियुक्ती करवुन 2024 पर्यंत या योजना पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सारंगखेडा, प्रकाशा, लोणखेडा, खापर, अक्कलकुवा या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा यात समावेश आहे. या योजनांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असुन आराखडे तयार करण्याचा कामाला गती देण्याच्या सुचना खा.डॉ. हिना गावित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील दुधाळे, होळ, पातोंडा, वाघोदा, रनाळा, शनिमांडळ, सारंगखेडा, प्रकाशा, खापर, अक्कलकुवा, लोणखेडा अशा 11 गावांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. म्हणुन या योजना डिसेंबर 2021 पर्यंत कार्यारंभ आदेश होऊन पुर्णत्वास नेण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखुन ग्रामीण जनतेला याचा लाभ व्हावा. यासाठी युध्द पातळीवर काम करावे, असेही खा.डॉ. हिना गावित व आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी संबंधितांना सुचित केले आहे. शहरालगत पडलेले नविन प्लॉट्स, नियोजित वसाहतींना या योजनेत सहभागी करुन त्यांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना खा. डॉ. हिनाताई गावित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीला कार्यकारी अभियंता निकुंभ, उपअभियंता, विविध यंत्रणांचे अधिकारी, रामचंद्र पाटील, हरीभाई पाटी, शरद तांबोळी, जयपाल रावल, शनिमांडळ, तलवाडे, दुधाळे या गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण व शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन योजनांव्दारे मुबलक पाणी मिळावे, यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे ही खा.डॉ. हिना गावित यांनी स्पष्ट केले आहे.