म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे आमदार कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपा महिला मोर्चा प्रवेश केला. .
याप्रसंगी विजय चौधरी म्हणाले की , महिलांचा भारतीय जनता पक्षात योग्य सन्मान केला जाईल महिला संघटन मजबूत होईल सर्वांनी एकोप्याने व एकजुटीने पक्षाचे काम करावे. पक्षासाठी कमीत कमी प्रत्येक महिलेने दोन तास दिले पाहिजे. महिलांनी भाजपात पक्ष प्रवेश केला ते पुढील प्रमाणे शिला मराठे जिल्हासंघटन, ज्योती पाटील महिला दक्षता जिल्हा उपाध्यक्ष ,शोभा पाटील तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी, रीता सोमवंशी उपाध्यक्ष ,कविता भागवत शहर उपाध्यक्ष, शीतल पाटील तालुका सचिव राष्ट्रवादी ,सुनंदा पाटील उषा पाटील, रेखा पाटील ,राणी सोनवणे ,कविता पवार सरला पाठक ,
जागृती नातू ,नीता पाटील, चंद्रकला गिरासे ,गौरी जैन ,पार्वता जगताप, अनिता हरदास ,शीला भावसार ,रजनी माळी, सोनी सोनवणे ,योगिता राजपूत ,सुरेखा पाटील या महिलांनी प्रवेश केला
याप्रसंगी जिल्हा महिला मोर्चाचे उपाध्यक्ष नंदाताई सोनवणे .जिल्हा सचिव संगीता पाठक, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भावनाताई लोहार, शहर अध्यक्ष रोहिणीताई भावसार, जिल्हा महिला उपाध्यक्ष कल्पना पंड्या यांच्या उपस्थितीत महिलांनी प्रवेश केला. विशेष सहकार्य म्हणून जिल्हा सरचिटणीस जितु जमदाडे .शहराध्यक्ष विनोद जैन. युवा अध्यक्ष राजीव देसाई,शहर उपाध्यक्ष पंकज सोनार. अक्षय अमृतकर,कमलेश जांगिड,डॉ योगेश चौधरी ,लक्ष्मीकांत वसावे, ईश्वर पाटील ,घनश्याम पाठक ,योगेश पाटील (गोगापूर ),सुभाष वाघ, हेमराज पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








