म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील शेतक-याचा वीस एकर ऊस इलेक्ट्रीक शाॅर्ट सर्किटने आग लागून दोन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.
पिंप्रीकडून सुलवाडा फिडरची मेन लाईनची विजेची तार ऊसाच्या शेतातून गेली आहे.त्याच्या शाॅर्ट सर्कीट झाले. याबाबत तलाठी पिंप्री यांनी घटनास्थळी भेट दिली असून शहादा पोलीसात अकस्मात अग्नी उपद्रवअंतर्गत पंचनामा करून नोंद करण्यात आली आहे. म्हसावद येथील शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांचे गट सर्व्हे नंबर 22,23,सुरेखा मधुकर पाटील 24,योगेश मधुकर पाटील 25,26 मधील यांचे तिघांचे नावे असलेला पिंपरी शिवारात खोडवा प्रजातीच्या वीस एकर ऊसाला शनिवारी संध्याकाळी अचानक आग लागली.आग लागल्याचे कळताच पिंपरी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.
मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. इलेक्ट्रीक शाॅर्ट सर्किटने आग लागल्याने संपुर्ण वीस एकर ऊस जळून खाक झाला.यामुळे शेतक-याचे दोन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.याबाबत शहादा पोलीसांनी पंचनामा करून नोंद केली आहे.तातडीने सातपुडा साखर कारखान्यामार्फत ऊस तोड सुरू करण्यात आली आहे.