Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

team by team
February 26, 2026
in राज्य
0
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सव 2026 चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत सर्व जिल्हा व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांमधील क्रीडा व कला क्षेत्रातील सुप्त गुणांना वाव मिळावा व वर्षभर शासकीय काम करित असताना येणाऱ्या ताण तणाव कमी व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमार्फत नंदुरबार येथील पोलीस मैदानावर तीन दिवशीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर रिमोटद्वारे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच रिमोट द्वारे क्रीडाज्योत प्रज्वलन करण्यात येवून मैदानावर क्रीडाज्योत फेरी करण्यात आली. क्रीडाज्योत फेरीत जिल्ह्यातील राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी खेळाडू सहभागी झाले होते. नंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ करण्यात आला.

क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सव उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, प्रकल्प संचालक आय. बी. पवार ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके , जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे, कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी, शैलेश शिंदे ,अजय पाटील तसेच गटविकास अधिकारी देविदास देवरे, राजू किरवे ,महेश पोतदार, विजय अहिरे ,संगीता नाईक ,संजय पाटील आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची शपथ दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी उपस्थित सर्व कर्मचारी यांना तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात उत्फूरीर्तपणे सहभाग नोदवून खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पथराईच्या के.डी.गावित सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या समोर मल्लखांबाचे विविध प्रात्यक्षिक केले.

तसेच डॉ.काणे हायस्कूल, कमला नेहरू विद्यालय ,एकलव्य विद्यालयाचे विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन सामाजिक ऐक्याचा दर्शन घडविले .तसेच विद्यार्थ्यांनी पथसंचालनातही आपला सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे पथसंचलन व सांस्कृतिक जथ्थाचे आयोजन करण्यात आले होते. पथसंचलनात शहादा पंचायत समितीने प्रथम क्रमांक, नंदुरबार पंचायत समितीने द्वितीय तर अक्कलकुवा पंचायत समितीने तृतीय क्रमांक मिळविला. सांस्कृतिक जथ्थ्यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या “‘वारकऱ्यांची वारी ,प्रशासन आपल्या दारी” यास प्रथम क्रमांक मिळाला. तर शहादा पंचायत समितीने सादर केलेल्या ‘पंढरीची वारी ‘ यास द्वितीय क्रमांक तर नवापूर पंचायत समितीने सादर केलेल्या आदिवासी नृत्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पथ्संचलनात व सांस्कृतिक जथ्थ्यात पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व विभाग प्रमुखांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.
नंदुरबार जिल्हा परिषदेमार्फत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तीन दिवस सुरू राहणार आहे. या महोत्सवांतर्गत दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी विविध क्रीडा स्पर्धा होणार असून यात जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी खेळाडू सहभागी होणार आहेत. तर दिनांक 26 फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 चे आयोजक सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

Next Post

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

Next Post
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add