Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

team by team
February 26, 2026
in शैक्षणिक
0
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का. वि. प्र . सं. संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली.

यंदाच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी गाव व शाळा परिसराची स्वच्छता करून संतांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक पी. डी. पाटील सर यांच्यासह ए. व्ही. कुवर, ए. एस. पटेल, व्ही. व्ही. ईशी, वैभव नाईक, पी. बी. पाटील, मयूर पाटील, सौ. सी. व्ही. पाटील, श्रीमती मोनिका पाटील, अश्विनी पाटील, दिपाली धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थी चैतन्य ज्ञानेश्वर पाटील याने साकारलेली संत गाडगे महाराजांची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्याच्या प्रभावी सादरीकरणातून स्वच्छता, स्वावलंबन, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन या संतांच्या विचारांचा जिवंत संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला.
कार्यक्रमात सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व आणि संस्कारमूल्यांचा संदेश देण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात
प्राचार्य श्री. सुर्यवंशी यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले,
“संत गाडगे बाबा यांनी दिलेला ‘स्वच्छ गाव – सुंदर गाव’ तसेच ‘स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ हा संदेश आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणला पाहिजे. शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आणि समाजसेवेची भावना जोपासणे हीच खरी संतांची शिकवण आहे.

 

यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत शाळा व गाव परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश कृतीतून दिला. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. सी. व्ही. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना दृढ झाली असून गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

Next Post

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

Next Post
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add