नंदूरबार l प्रतिनिधी
बाल पणीची मैत्री ही निस्वार्थ व पक्की असते ती आयुष्यभर पुरते व मित्राच्या मृत्यू नंतरही आठवणींच्या स्वरूपात कायम असते, असेच एक उदाहरण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व रघुवंशी बुक डेपोचे मालक आनंद रघुवंशी यांच्या आयुष्यात घडले.
त्यांचे बालमित्र बळीरामभाई रमेशभाई पटेल(मूळ गाव कोठली)हे लहानपणापासूनच शिक्षणानिमित्त परदेशीपुऱ्यात राहत होते. कोरोनात त्यांचे निधन झाले, या मित्राच्या स्मृती निमित्त आनंद रघुवंशी यांनी त्यांच्या अध्यक्ष काळात सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू केलेला लायन्स अन्नपूर्णा प्रकल्पात वर्षभर महिन्यातील एक दिवस या योजनेत सहभाग नोंदवला व मैत्री व दातृत्वाचे एक उदाहरण समाजापुढे ठेवले.
यावेळी वाटप प्रसंगी प्रशांत पाटील, दुर्गा पाटील, ओम पाटील,चित्रा पाटील, पृथ्वीराज पाटील, सतीश चौधरी आदी उपस्थित होते .लायन्स परिवाराने कै.बळीराम पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.








