सारंगखेडा l प्रतिनिधी
मनमोहक अदाकारी , ठूमके , ठसकेबाज धमाल , भन्नाट नृत्य अविष्कार सादर करून राज्यासह स्थानिक कलाकारांनी नृत्य स्पर्धा गाजवली . सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल मध्ये झालेल्या राज्यस्तरीय सामूहिक , एकल नृत्य व जिल्हा परिषद मराठी शाळा केंद्रातंर्गत सामुहिक नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या .
येथील यात्रोत्सवानिमित्त चेतक फेस्टिव्हलच्या समारोप कार्यक्रमात राज्यस्तरीय सामूहिक , एकल नृत्य व जिल्हा परिषद मराठी केंद्रतंर्गत शाळेतील सामुहिक नृत्य स्पर्धा झाल्या . नृत्याच्या आविष्काराने चेतक फेस्टिव्हलच्या व्यासपिठावर शनिवारची रात्र नृत्यमय झाली होती . खानदेशी , आदिवासी , हिंदी , देशभक्ती , राजस्थानी , गुजराथी आदी नृत्यविष्काराने विद्यार्थी कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी मंचावर रसिकांची सर्वाधिक गर्दी झाली होती . राज्यातून आलेल्या युवक , युवतींनी केलेल्या प्रत्येक नृत्याने लक्ष खिळवून ठेवले होते . यावेळी चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले .सरंपच पृथ्वीराजसिंह रावल , केंद्र प्रमुख वसंत जाधव , चंद्रशेखर पाटील , राजेंद्र तावडे , रमेश पाटील , संतोष मोरे ,शरद शिरसाठ , गणेश कुवर , आर .बी. राजपूत ,पुरुषोत्तम आगळे , प्रमोद जोशी , भरत धोबी , जाकीर खाटीक आदी उपस्थित होते .
जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समूह नृत्य स्पधेत प्रथम कळंबु शाळा शिवचरित्र थीम डान्स , ;द्वितीय व तृतीय बिलाडी त . सा . शाळा . आदिवासी वादळ आले व तलवारो पे सर वारदे या शाळांचा सन्मान करण्यात आला .
राज्यस्तरीय १४ वर्षे आतील एकल नृत्य स्पधेत प्रथम शिरपूर येथील हुनर डेमराणी , द्वितीय शिरपूर येथील अद्वैत पाटील ,तृतिय नंदूरबार येथील निलेश अग्रवाल , पंधरा वर्षा वरील एकल नृत्य मध्ये प्रथम सुरत येथील आकाश सोनवणे , द्वितीय शिरपूर येथील अक्षय सोनवणे , तृतीय खेतिया येथील सतीश साठे , तसेच १४ वर्षे आतील ट्रॅडिशनल एकल नृत्य प्रथम नंदूरबार येथील रक्षिता शर्मा , द्वितीय शहादा येथील आर्या चौधरी , तृतीय दोंडाईचा येथील गरिमा उज्येद्र तर १५ वर्ष वरील ट्रॅडिशनल एकल नृत्य नाशिक येथील अरविंद लोखंडे , द्वितीय सुरत येथील तेजस यादव तृतीय दोंडाईचा येथील निमिषा खडसे , राज्यस्तरीय समूहनृत्य प्रथम मुंबई येथील रंगीला डान्स ग्रुप , द्वितीय धुळे एम .जे. डान्स व नंदूरबार ग्लोरीयस गर्ल्स बॉईज यांना विभागून देण्यात आला.परीक्षक म्हणून सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर टोबे फर्नाडिंस , कुश बनकर , अभिनव गुसेन यांनी काम पाहिले . सुत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले .








