Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम ३६ लागू

team by team
September 9, 2021
in क्राईम
0
पोलीस अधीक्षकांच्या बदली संदर्भातील ती पोस्ट बाबत डी.जी.पी.नी केले ट्विट
नंदुरबार l प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने महत्तपुर्ण निर्णय घेतला आहे . राज्यभरात १० सप्टेंबर २०२१ पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे . या पार्श्वभूमीवर नंदुरबार  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दि. २० सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे .
या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये , तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तणूकीबाबत , वाद्य वाजविणे व सभेचे आयोजन , त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत , लाऊड स्पीकर वापरणेबाबत योग्य निबंध व निर्देश देण्याचे अधिकार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे . असे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे . सार्वजनिक ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणूकास निबंध घालण्याचे अधिकार , सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे , गाणी गाणे , ढोल ताशे वाजवणे इत्यादीवर निबंध घालण्याचे अधिकार , रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था टेवण्यासाटी निर्देश देण्याचे अधिकार , सार्वजनिक ठिकाणी , रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजवण्यावर निबंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार , तसेच कलम ३३ , ३५ ते ४० व ४५ मुंबई पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत . दरम्यान , सदर आदेश लागू असताना सभा , वाद्य वाजवणे , लाऊड स्पीकर वाजवणे , घोषणा देणे , संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी . तसेच सर्व याबतीत पोलीस ठाणे अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे , अशा सूचना देण्यात आल्या आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील २ टोळ्यातील १४ जण २ वर्षासाठी तर शहादा येथील एका टोळीतील ५ इसम १ वर्षासाठी जिल्ह्यातुन हद्दपार

Next Post

नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे बदली

Next Post
पोलीस अधीक्षकांच्या बदली संदर्भातील ती पोस्ट बाबत डी.जी.पी.नी केले ट्विट

नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add