Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील २ टोळ्यातील १४ जण २ वर्षासाठी तर शहादा येथील एका टोळीतील ५ इसम १ वर्षासाठी जिल्ह्यातुन हद्दपार

Mahesh Patil by Mahesh Patil
September 9, 2021
in क्राईम
0
पोलीस अधीक्षकांच्या बदली संदर्भातील ती पोस्ट बाबत डी.जी.पी.नी केले ट्विट
नंदुरबार  l प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील ३ गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ इसमांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश आज दिले आहेत . नंदुरबार जिल्ह्याच्या स्थापनेपासुन एकाच वेळी १ ९ इसमांना हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे . हद्दपार करण्यात आलेल्यांपैकी १४ इसम हे नंदुरबार शहरातील असुन त्यांना दोन वर्षांसाठी तर ५ इसम हे शहादा तालुक्यातील असुन त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे .
नंदुरबार शहरात तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्या इसमांना यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते . त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणेकडून २ टोळ्या व शहादा पोलीस ठाण्याकडून १ टोळीस हद्दपार करण्याबाबत  प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता . सदर हद्दपार प्रस्तावांची छाननी करुन योग्य कायदेशीर प्रकिया पार पाडून ३ गुन्हेगारी टोळ्यातील १९ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित यांनी दिले आहेत . नंदुरबार शहर हद्दीत राहणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळीतील १४ इसमांविरूद्ध शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असुन शहादा तालुका हद्दीत राहणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीतील ५ इसमांविरुध्द मालमते विरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत . नंदुरबार शहर हदीत राहणारे  पप्पू ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरेशी, नायाब खान जहिर खान कुरेशी, फिरोज खान जहिर खान कुरशी, सिकंदर खान जहिर खान कुरेशी, राजु ऊर्फ फिरदोस खान जहिर कुरैशी, मुश्तकीन शेख शहाबुद्दीन कुरेशी,  शेख इस्तीयाक अहमद हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई,  शेख अल्ताफ शेख जमिल कुरैशी, शेख कलिम शेख जमिल कुरैशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरैशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरैशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरेशी, शेख शकिल शेख इसाक कसाई तर शहादा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे  महेंद्र घरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे सर्व डामरखेडा ता . शहादा अशी हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत , हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाचे आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत . आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री अजित पवार, नंदुरबार जिल्ह्यात एका वर्षाच्या आत बांधले जाणार राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम ३६ लागू

Next Post
पोलीस अधीक्षकांच्या बदली संदर्भातील ती पोस्ट बाबत डी.जी.पी.नी केले ट्विट

नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम ३६ लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group