नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आज प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.यात नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पी.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या.आज त्यांना हिरवा कंदील मिळाला असून राज्यातील विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.यात नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई येथे बदली करण्यात आली.त्यांच्या जागी कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक नागरी हक्क रांरक्षक म्हणून काम पाहणारे झाली असून पी.आर.पाटील यांची नंदुरबार पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.