नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार येथील नाभिक समाजाच्या बांधवावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदविणे बाबत चे निवेदन तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था मर्या, नवापूर तर्फे देण्यात आले.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नाभिक समाज बांधव,नवापूर आपणाकडे निवेदन सादर करीतो की, आमचे नंदुरबार येथील नाभिक समाजाचे बांधव दिपक सुर्यवंशी यांचे कोकणीहिल येथे नाभिक व्यवसायाचे दुकान असून रविवार १८ डिसेंबर २०२२रोजी अज्ञात लोकांनी येऊन त्यांच्यावर सायंकाळी प्राणघातक हल्ला केला. यात चार ते पाच गुंड हातात लाठ्या
काठ्या घेऊन आले व काहीही कारण नसतांना त्यांच्यावर हल्ला केला त्यात दिपक सुर्यवंशी यांना जबर जखमी केलेले आहे. सदरची बाब ही दिपक सुर्यवंशी यांच्या दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद झालेली आहे. तरी या घटनेस आम्ही नवापूर तालुका नाभिक हितवर्धक संस्था मर्या. नवापूरच्या वतीने जाहीर निषेध करीत असून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करुन दिपक सुर्यवंशी यांना न्याय मिळवून द्यावा बाबत आम्ही आपणास विनंती करीत आहोत असे निवेदना मध्ये म्हटले आहे.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुधिर निकम,उपाध्यक्ष मुकेश वारुडे,सचिव विनायक सुर्यवंशी,संजय सोनवणे,सतीश मोरे,मनोज बोरसे,सिध्दु भदाणे,रविंद्र सोनवणे,अनिल वारुडे,राहुल मोरे,सोमनाथ महाले,विश्वास सोनवणे,गिरीष वरसाळे,प्रशांत हिरे,श्रीकांत मोरे,नितीन मोरे,शुभम हिरे,दर्शन हिरे,,आकाश हिरे,ज्ञानेश्वर देवरे,गौरव सैंदाणे,सागर सोनवणे,अशोक सैदाणे,,संदिप हिरे,गोविद मोरे,किशोर मोरे यांच्या सह्या आहेत.








