Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी गटातून बाबुलाल तर व्यापारी गटातून मलंग अश्र्वाने पटकाविला प्रथम क्रमांक

team by team
December 21, 2022
in राज्य
0
शेतकरी गटातून बाबुलाल तर व्यापारी गटातून मलंग अश्र्वाने पटकाविला प्रथम क्रमांक
सारंगखेडा l प्रतिनिधी 
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त सुरु असलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्व मैदानावरील ट्रॅकवर अश्व शर्यती घेण्यात आल्या . त्यात व्यापारी वर्ग व शेतकरी वर्ग अशा दोन गटात स्पर्धा झाल्या . त्यात ३६ घोड्यांचा सहभाग होता . शेतकरी गटातून प्रथम क्रमांक बाबुलाल अश्व , तर व्यापारी गटातून मलंग याने प्रथम क्रमांक पटकावला या शर्यती पाहून हजारो अश्वशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले .
          चेतक फेस्टिव्हल अंतर्गत आज घोडयाच्या धावण्याची स्पर्धा झाली . यात एकूण ३६ घोडयांचा सहभाग होता .सहा राऊंडमध्ये पाच . पाच घोडयांना तीन राऊंड नुसार दौडविण्यात आले . त्यातून एक . एक असे अंतिम राऊंडमध्ये पाच मधून तीन विजेते काढून त्यांना गौरविण्यात आले . अत्यंत चित्तथरारक दौड पाचही राऊंडमध्ये झाली . घोडयांची दौड पाहून उपस्थित अश्वप्रेमीच्या डोळ्याचे पारणे फिटले . मुंबई , दिल्लीच्या धर्तीवर ही स्पर्धा झाली . शेतकरी गटातून झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमाक प्रताप पाटील यांचा बाबुलाल , द्वितीय विजय भोसले यांचा बारूद तर तृतीय विक्की पाटील यांचा व्हायरस तर व्यापारी गटातून प्रथम क्रमांक गौस खान उत्तर प्रदेश यांचा मलंग  , द्वितीय मोरबी ( गुजरात ) येथील किशोर भाई यांची उडान तर तृतीय बरेली ( उत्तर प्रदेश ) येथील बिजली यांचा सन्मान करण्यात आला .
        विजेत्यांचा जल्लोष 
        विजेत्या अश्वमालकांनी स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या घोड्यांवर पाचशे रुपयांचा नोटा उडवित विजयाचा आनंद साजरा केला .ढोल . ताशांच्या गजरासह नृत्य करीत गुलालाची उधळण केली .विजयानंतर प्रथम , द्वितिय व तृतीय आलेल्या अश्वमालकांनी सुमारे तासभर तल्लीन होऊ नाचत आनंदोत्सव साजरा केला .विजेत्या स्पर्धकांना चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते गौरविण्यात आले .आरिफ शहा व पुरुषोत्तम आगळे यांनी कार्यक्रमाचे प्रसारण केले . यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , दिग्वीजयसिंह रावल , प्रणवराजसिंह रावल , गोवर्धन पाटील , शरद शिरसाठ , गणेश कुवर आदी उपस्थित होते .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील समाज बांधवांच्या हल्ल्याचा नवापुर येथे नाभिक समाजातर्फे निषेध

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add