Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला अन् घरातल्या प्रत्येक व्यक्तिला शुद्ध पाणी देणार: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
December 17, 2022
in राजकीय
0
जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला अन् घरातल्या प्रत्येक व्यक्तिला शुद्ध पाणी देणार: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी पोहचवण्याचा मानस आहे. तसेच येणाऱ्या ३० वर्षातील लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते आज केंद्र सरकार व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मंजुर योजनांच्या तालुक्यातील दुधाळे येथील भुमी पुजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित नंदुरबारच्या एमजीपी योजनेचे अधिकारी श्री. निकुंभे,श्रावण चव्हाण,
सविता जयस्वाल,बापू पवार, जालिंदर पवार, बेबीबाई गावित,सरलाबाई पवार,दीपक पवार,रमेश बोरसे,पावबा मोरे,नरेंद्र पाटील,जगदिश पाटिल,मक्खन कोळकर, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ५५ लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिन याप्रमाणे पुरविण्यात यावे, असे मानक या योजनेचे आहेत. या मानकाप्रमाणे २०२४ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के आणि १० टक्के लोकवर्गणी अशी निधीची उपलब्धता राहणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालविल्यास आणि देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने केल्यास ग्रामपंचायतीला योजनेच्या एकूण खर्चाच्या १० टक्के रक्कम प्रोत्साहन बक्षीस म्हणून देण्याची यात तरतूद आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले

मागेल त्याला घर देणार

घरकुलांच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याची मोहिम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली असून ज्यांचा पात्रतेच्या निकष यादीत समावेश होवू शकलेला नाही, अशाही मागणी करणाऱ्या प्रत्येक समुदायातील व्यक्तिला पुढील वर्षात हक्काचे घर मिळवून देणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा गाभा आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत देशातील ग्रामीण भागातील घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे. यानुसार आदिवासी पाडे, शाळा, अंगणवाडी, वसतिगृहे आदी ठिकाणीही नळ जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार कडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मंजुर पातोंडा, वाघोदा,खोंडामळी (८ गावे )व उमर्दे (६ गावे) या योजनांच्या भुमीपूजनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

उद्या होणारे भूमिपूजनाचे कार्यक्रम

उद्या (रविवार, दि. १८ डिसेंबर२०२२) जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोपर्ली, सारंगखेडा, कुकावल, वडाळी व प्रकाशा येथील योजनांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नंदुरबार यांच्यावतीने देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रंगावली नदीवरील पुल बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

Next Post

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. चा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add