Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

team by team
November 18, 2022
in क्राईम
0
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार | प्रतिनिधी-

नंदुरबार येथे इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असुन त्याच्या ताब्यातुन  ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना दिले.
वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्दत यांची इत्थंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.

 

 

 

त्यातच १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील रमेश पुरुषोत्तम पाटील रा- प्लॉट नंबर १४१, गिरीविहार सोसायटी नंदुरबार यांच्या घराबाहेर वापरासाठी नगरपालिकेच्या नळाला कनेक्शन केलेली ५ हजाराची पाण्याची मोटार कोणी तरी अज्ञात आरोपीतांनी चोरून नेली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुध्द् चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहर व उपनगर परीसरात इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारा हा नंदुरबार शहरातील सराईत गुन्हेगार असून तो आज मण्यार मोहल्ला येथे चोरीच्या इलेक्ट्रीक मोटार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील मण्यार मोहल्ला परिसरात सापळा लावला. १८ नोंव्हेंबर २०२२ रोजी १२ वा. सुमारास दोन संशयीत इसम हातात हातात पांढर्‍या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या व सोबत एक लहान मुलांची सायकल घेवून येतांना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या दिशने जात असतांना दोन्ही संशयीत इसमांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून पळण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने चंद्रशेखर नथ्थु मेश्राम रा. चिचपाडा भिलाटी, नंदुरबार, शाहरुख खान अस्लम खान पठाण र् रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार  यांना अटक केली.

 

 

 

दोन्ही संशयीत आरोपीतांची कायदेशीर प्रक्रिया करुन तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीचे ५ इलेक्ट्रीक मोटर व ५ हजाराची एक लहान मुलांची सायकल मिळून आले त्यांना इलेक्ट्रीक मोटर व सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे इलेक्ट्रीक मोटर मागील काही दिवसांमध्ये नंदुरबार शहरातील विविध भागातून व सायकल नंदुरबार शहरातील एम.एल टाऊन परिसरातून चोरी केल्याचे सांगितले.

 

 

 

 

मिळून आलेले इलेक्ट्रीक मोटर बाबत नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाण्याचा अभिलेख पाहिले असता इलेक्ट्रीक चोरी बाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सदर इलेक्ट्रीक मोटर व सायकल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आले आहेत तसेच तिन्ही संशयीत आरोपीतांना पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून इलेक्ट्रीक मोटर व सायकल चोरी बाबत गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, रमेश साळुंखे, पोलीस शिपाई राजेंद्र काटके, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

Next Post

फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

Next Post
फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add