Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

team by team
November 18, 2022
in क्राईम
0
फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार येथुन फसवणूकीच्या गुन्ह्यातील ४ वर्षांपासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने राजस्थान राज्यात बेड्या ठोकल्या आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, १३ जुलै २०१९ ते  ८ ऑगस्ट २०१९ दरम्यान मनोज मनमोहनदास बैजल रा. जयपुर आदिंनी नंदुरबार शहरातील हॉटेल हिरा एक्झीकेटीव्ह मध्ये वेगवेगळ्या नावाने रुम बुक करुन त्यात वास्तव्य करुन हॉटेलच्या रुमचे बिल न देता हॉटेल मधील लॅपटॉप व इतर साहित्य चोरुन नेले, म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४२०,३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु गुन्हा घडल्यापासुन मनोज मनमोहनदास बैजल रा. जयपुर व त्याचे इतर साथीदार फरार होते.

 

 

सदर गुन्ह्यातील एक पाहिजे संशयीत आरोपी मनोज मनमोहनदास बैजल हा राजस्थान राज्यातील जयपुर शहरातील मानसरोवर परिसरात राहात असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाली होती.

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर बातमीची खात्री करुन पाहिजे आरोपी अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ राजस्थान राज्यातील जयपुर येथे रवाना केले.स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने राजस्थान राज्यातील जयपुर शहर गाठून तेथे पाहिजे आरोपी नामे मनोज बैजल याचा शोध घेण्यास सुरुवात केली,

 

 

 

 

परंतु आरोपी हा अत्यंत चालाख असुन पोलीसांना वेळोवेळी गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता. तसेच आरोपीताचा फोटो किंवा मोबाईल नंबर देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे नव्हता, त्यामुळे त्यास ओळखणे कठीण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जयपुर सारख्या अनोळखी शहरामध्ये सतत ३ दिवस मुक्काम करुन आरोपीताबाबत इत्थंभूत माहिती काढण्यात पथकाला यश मिळाले

 

 

व नमुद आरोपी हा जयपुर शहरातील जनता स्टोअर्स परिसरात येत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास निदर्शनास आल्याने पथकाने जनता स्टोअर्स परिसरात सापळा लावला. आरोपी जनता स्टोअर्स परिसरात फिरत असतांना त्यास पोलीस आल्याचा संशय त्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने लावलेला सापळा मजबुत असल्याने त्यास पळुन जाता आले नाही व तो पोलीसांच्या सापळ्यात अडकला. पथकाने मनोज मनमोहनदास बैजल रा. जयपुर यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार  मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार भाजपा आ.राजेश पाडवी यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

Next Post
शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार  भाजपा आ.राजेश पाडवी यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार भाजपा आ.राजेश पाडवी यांच्याकडून शिंदे - फडणवीस सरकारचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add