नंदुरबार l
शहरातील मच्छिबाजार परिसरात चाकू कब्जात बाळून मनाई आदेशाचे उल्लंघन करुन फिरतांना आढळून आल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील मोहंमद शरीफ खाटीक हा मच्छिबाजार परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन चाकू कब्जात बाळगतांना आढळून आला.
याबाबत पोशि.हेमंत बारी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात मोहंमद शरीफ खाटीक याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायादा कलम ३७(१), (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान जगताप करीत आहेत.








