Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे खंडपीठाचे महत्वपूर्ण आदेश

team by team
November 18, 2022
in क्राईम
0
अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे खंडपीठाचे महत्वपूर्ण आदेश
नंदूरबार l प्रतिनिधी
 मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायालयीन लढा दिल्यानंतर यशाचे शिखर गाठण्यात यश  आले असून अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे महत्वपूर्ण आदेश दिले.
 याचिकाकर्ती मिनल उत्तम पाडवी, राहणार भगदरी, ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार, हिने सन २०१८ साली माननीय विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे विभाग, धुळे, यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तरी देखील संबंधित अधिकारी यांनी नियुक्तीच्या संदर्भात कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला नव्हता. म्हणून याचिकाकर्ती हिने सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत रिट याचिका क्रमांक ५७११/२०२१ दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदर प्रकरणात माननीय विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग, धुळे, यांना नोटीस बजावल्यानंतर  सदर प्रतिवादी यांनी पत्रान्वये याचिकाकर्ते हिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कळविले होते. तसेच सदर कागदपत्रांची पडताळणी नंतर सदर मंजूर प्रकरण नेमणुकी करिता मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात येईल असे कळविले होते.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये सदर पत्राच्या संदर्भानुसार प्रकरण निकाली काढण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. सदर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही सदर अर्जावर कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्यात आल्यामुळे याचिकाकर्ते हिने माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक  १३५१२/२०२१ दाखल केली असता माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( माननीय न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व माननीय न्यायमूर्ती  एस. जी. दिघे ) यांनी आदेशान्वये दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे  आदेश पारित केले होते. त्या अनुषंगाने याचिकाकर्ती हिला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत महत्वपूर्ण आदेश पारित केले. न्यायालयीन लढा दिल्यानंतर यशाचे हे शिखर गाठण्यात यश आले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.
बातमी शेअर करा
Previous Post

चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

Next Post

जैन आचार्य श्री जिनकान्तिसागरसूरीश्वरजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

Next Post
जैन आचार्य श्री जिनकान्तिसागरसूरीश्वरजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

जैन आचार्य श्री जिनकान्तिसागरसूरीश्वरजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add