नंदुरबार lनंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच वात्सल्य सेवा समितीतर्फे येथे दोन दिवशीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जिल्हाभरातून सुमारे २६८ विज्ञान प्रकल्प सादर होणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान या विषयात गोडी निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून दरवर्षी भारत सरकारकडून या विज्ञान परिषदेचे आयोजन दरवर्षी होत असते. यंदाचे हे ३० वे वर्ष असून यांचे आयोजन या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक संस्था वात्सल्य सेवा समिती मार्फत दि.१९ व २० नोव्हे रोजी डी.आर.हायस्कूल येथे सकाळी १० ते ०५ या वेळेत आयोजन केले आहे.
या उपक्रमासाठी इ. ५ ते ७ व इ.८ ते १२ असे ०२ गट करण्यात आले असून संपूर्ण जिल्हयातून एकूण २६८ प्रकल्प सादर होणार आहेत. यातील तज्ञ परीक्षकांमार्फत १६ प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धसाठी निवड करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी या उपक्रमाचा मुख्य विषय आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे असा असून ०५ उपविषय देण्यात आले आहेत. या सर्व विषयांवर जिल्हयातील विविध शाळातील विद्यार्थी प्रकल्प सादरी करणार आहेत.
तरी विज्ञान प्रेमी विद्यार्थी, पालक, नागरीकांनी या उपक्रमास भेट द्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी कार्यालयमाध्यमिक विभाग-जिल्हा परिषद, नंदुरबार व वात्सल्य सेवा समिती, नंदुरबार तथा या उपक्रमाचे शेक्षणिक समन्वयक पंकज पाठक, जिल्हा समन्वयक आशिष वाणी व मिलींद वडनगरे व वात्सल्य सेवा सिमतीने केले आहे.








