धडगाव l प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी धडगांव तहसिलदार श्री.सपकाळे, व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, बीजरी या ग्रुप ग्रामपंचायतीत एकुण ७ गावे येतात. ६ गावात ग्रामसभा होते. मात्र गोऱ्या या गावात पेसा ५ टक्के निधीची मिटिंग का होत नाही.ग्रामकोष समिति तयार करण्यासाठी देखील मिटिंग झाली नाही. व मागील १०वर्षाचा निधी खर्च झालेला नाही.यासाठी शासन, प्रशासन यांना वारंवार निवेदन दिले असुन या बाबत दुर्लक्ष होतांना दिसून येते.गावाचा विकास करण्यासाठी आलेला पेसा 5 टक्के निधी खर्च तर केला नाही मग हा १० वर्षाचा निधी शासनाला परत केला का कोणाच्या खिशात जमा झाला.यासाठी गोऱ्या गावात कोविडचे-19 नियमाचे पालन करून पेसा निधीचे नियोजनासाठी विशेष ग्रामसभा घेऊन गावातील मुलभुत प्रश्न सोडवावे. गावाच्या विकासासाठी आलेला पेसा निधी खर्च होत नाही.अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम १९९६ तसेच वनहक्क अधिनियम २००६ या कायदयाद्वारे आदिवासी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आलेले असून आदिवासींच्या विकासासाठी दरवषीँ ५ टक्के पेसा निधी उपलब्ध करून दिला जातो.परंतु ग्रामसभाच होत नाही मग निधी कसा खर्च केला जातो? सदर १० वर्षाचा निधी खर्च झालेला नाही.सदर लक्षात घेता अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीतील वाडया, वस्त्या, पाडयांना स्वतंत्र ग्रामसभा घेणेस बंधनकारक आहे.यासाठी गोऱ्या गावात राजकीय दबाव असल्यामुळे गावात पेसा मिटिंग होत नाही का ? गावात काम न करता निधीचा अपहरण झालेला आहे का? आदी माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व गावाचा विकास व्हावा यासाठी गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर रुपसिंग पराडके, मालतीबाई पराडके, आपसिंग पराडके, दिलीप पराडके, पेंजराबाई पराडके, पालसिंग पराडकेे, गुलाब पराडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.