Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सघोष पथसंचलन

team by team
November 16, 2022
in राजकीय
0
नंदूरबार येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सघोष पथसंचलन
नंदूरबार l प्रतिनिधी
जनजाती गौरव दिन, भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदुरबार यांच्या तर्फे शहरातून जिल्हा सघोष पथसंचलन करण्यात आले.
       राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आदिवासी जनजाती गौरव दिन अर्थात जननायक बिरसा मुंडा जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी जिल्हा संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.संचलनासाठी जिल्हाभरातून 140 पूर्ण गणवेशातील स्वयंसेवक उपस्थित होते. नंदुरबार येथील पंडित दीनदयाल चौक येथून पथसंचलनास सुरुवात झाली व पुन्हा तेथेच समारोप झाला.यावेळी संघाचे  जिल्हा संघचालक गुलाबसिंग वसावे यांनी उपस्थित स्वयंसेवकांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली आणि आजच्या दिवसाचे औचित्य विशद केले.
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील छोटा नागपूर मधील ओलीहातू गावात 15 नोव्हेंबर 1875 ला झाला होता वडील सुगना मुंडा व आई कर्मी या निर्धन असल्याने दुसऱ्या गावात मजुरी करीत असत बिरसांचे बालपण सर्व सामान्य मुलांप्रमाणे गावात खेळण्यात ,जंगलात भटकण्यात गुरे चारण्यात गेले.तरी सुद्धा ते असामान्य होते त्यांच्या बासरी वादनाने पशुपक्षी आनंदी व एकाग्र होत. बिरसा मुंडा मोठे झाल्यावर गरिबीमुळे त्यांना मामा व मावशीकडे काही दिवस आई-वडिलांनी ठेवले होते.त्यांनी शिकून खूप मोठे साहेब व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती , परंतु शिक्षण घेत असतांनाच भोळ्या लोकांच्या भाबडेपणा चा फायदा घेऊन त्यांना धर्मांतरित केलं जाते हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांच्या मनात इंग्रजाबद्दल ही चीड निर्माण झाली,त्यांनी समाजाला जागृत आणि संघटित  करण्याचं काम केलं ,
त्यांनी बिसाईत नावाचा पंथ स्थापन केला ,अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले आणि अशा प्रकारे त्यांचे एक जनआंदोलन तयार झाले. लोक त्यांना आता धरती के आबा अर्थात परमेश्वर मानू लागले.एकाएकी बिरसांचा वाढलेला प्रभाव पाहून इंग्रज घाबरले आणि एक नवीन राष्ट्रीय विचाररांचा संन्यासी राजा बनून जनजातींना इंग्रज सत्तेविरुद्ध भडकावीत आहे अशी तक्रार त्यांनी  सरकारकडे केली. ब्रिटिश सरकारने ताबडतोब बिरसांच्या अटकेचा आदेश दिला. पोलीस अटक करण्यास पोहोचले पण ग्रामीण लोकांचा प्रचंड विरोध पाहून अटक न करता परत गेले इंग्रज सरकारने विशेष बैठक घेऊन बिरसांचा विरोध काहीही करून दाबून टाकण्याचा आदेश दिला. 25 ऑगस्ट 1895 ला फसवणुकीने सरकारने बिरसांना अटक करून हजारीबाग जेलमध्ये आणले परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना 30 नोव्हेंबवर 1897 ला मुक्त केले.एव्हाना सर्व जनजाती समाजाच्या मनात स्वातंत्र्याच्या धगधगत्या प्रेरणा घेऊन तयार असल्याचे तयार असल्याचे दिसून आले. धनुष्यबाण घेऊन आंदोलन  केले.
या हे सर्व सुरू असताना त्यांच्यावर सरकारने 500 रुपयाचे इनाम घोषित केले आणि गुप्तचरांमुळे आणि घर भेद्यांमुळे 3  फेब्रुवारी 1900 ला बंदगाव येथे बिरसांना अटक करण्यात आली आणि त्यांना रांची जेलमध्ये आणण्यात आले त्यांची अटकेची बातमी वणव्या प्रमाणे सर्वत्र पसरून सर्व क्षेत्र पेटून उठले. 9 जून 1900 ह्या दिवशी स्वतंत्रता सेनानी महानायक भगवान बिरसा मुंडा यांचा रांची जेलमध्ये रहस्यमय मृत्यू झाला आणि इंग्रज सरकारने अगदी गुपचूप पणे नदीकिनारी त्यांना अग्नी दिला गेला.  भगवान बिरसांनी भारतीय संस्कृती परंपरा व स्वधर्माच्या रक्षणासाठी आयुष्याच्या केवळ 25 व्या वर्षी आत्मबलिदान केले व संपूर्ण समाजाला एक नवीन दिशा दिली.
 धर्मांतरण करून जनजाती संस्कृती नष्ट करणाऱ्या काही देशविघातक प्रवृत्ती च्या लोकांचे प्रयत्न जसे चालू आहेत तसेच त्यांना विरोध करण्याचे कार्य देखील बंद झालेले नाही,भगवान बिरसांचे बलिदान आम्हा सर्वांना स्वधर्म रक्षणाची प्रेरणा देत राहील. त्यांची जयंती आमच्या जनजाती समाजाचा गौरव दिन आहे या सर्व महापुरुषांनी पूर्ण समाजाला जोडण्याचे काम केले त्या सर्व वीरांची आज आपण आठवण करून हे पवित्र कार्य पुढे वाढवण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन यावेळी गुलाबसिंग वसावे यांनी केले, आणि अभिवादन कार्यक्रमाची सांगता झाली.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त शोभायात्रा,भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी दाखवली हिरवी झेंडी

Next Post

प्रा.राहुल संधानशिव यांना पीएचडी प्रदान

Next Post
प्रा.राहुल संधानशिव यांना पीएचडी प्रदान

प्रा.राहुल संधानशिव यांना पीएचडी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add