नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३) अन्वये २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.








