नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे दर वर्षी ११ ते १३ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवरील शांतता, करुणा या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित होत असते.स्थानिक पातळीवर विजेते चित्र पुढिल पातळीवर पाठवण्यात येत असते.
अंतिम विजेता ठरल्यास चित्रकारास व परिवारातील २ सदस्यांना लायन्स परिवारातर्फे अमेरिकेस जायची संधी मिळत असते.यंदाच्या वर्षीची ही स्पर्धा डी. आर. हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आली होती.यात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यात कृष्णा सोनार हा विद्यार्थी प्रथम आला व त्याचे चित्र पुढील पातळीवर पाठवण्यात आले.
या स्पर्धेचे यशस्वी संयोजन करण्यासाठी कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.विजेत्या स्पर्धकांचे लायन्स क्लब अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी , कोषाध्यक्ष शंकर रंगलानी यांनी कौतुक केले आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, पर्यवेक्षक पंकज पाठक, राहूल पाटील, दिनेश वाडेकर उपस्थित होते.








