तळोदा l प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी तळोद्यातून काँग्रेसचे खंदे समर्थक व नगरसेवक पंधरा गाड्यांच्या लवाजमा घेऊन ठाणे येथे रवाना झाला.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकूळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.
तळोदा तालुक्यातील काँग्रेसचे बरेच नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत.काही अटी शर्तीच्या शब्द भाजप नेतृत्वाने द्यावा यासाठी फिल्डिंग सूरू आहे.अशातच काँग्रेसचे नगरसेवक, पालिकेचे प्रतोद गौरव वाणी व नगराध्यक्षा रत्नाताई चौधरीचे पती,विद्यमान नगरसेवक सूभाष धोंडू चौधरी यांचा प्रवेश निश्चित असल्याने ते मार्गस्थ झाले आहेत.उद्या दि ५ नोव्हेंबर रोजी प्रवेश केला जाणार आहे.सोबतच माजी नगराध्यक्षा सौ ताराबाई बागूल, नगरसेवक सतिवान पाडवी, राष्ट्रवादीचे भरत चौधरी यांच्या नावांची ही चर्चा आहे.
गौरव वाणी व सूभाष चौधरी हे माजी नगराध्यक्ष भरत माळी गटात असून माजी आमदार अँड पद्माकर वळवी यांचे कट्टर समर्थक असतांना भाजपात प्रवेश करत असल्याचे तालुक्यातील राजकारणात चर्चेचा आणी काँग्रेससाठी धक्कादायक निर्णय असल्याचे मानले जात आहे.
उद्याच्या प्रवेश कार्यक्रमासाठी तळोदा येथून आमदार राजेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते व प्रवेशार्थींचा मित्र परिवार उपस्थिती साठी रवाना झाला आहे. दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.








