Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अनुभवले सूर्यग्रहण

team by team
October 26, 2022
in शैक्षणिक
0
नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अनुभवले सूर्यग्रहण
नंदूरबार l प्रतिनिधी 
नंदूरबार येथे आशापुरी फाउंडेशन व नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सूर्यग्रहण अनुभवले.
25 ऑक्टोबर दुपारनंतरचा काळ म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणीच आहे. असे नक्षत्र छंद मंडळाच्या संचालिका सौ. चेतना पाटील यांनी सांगितले की, पौर्णिमेच्या चंद्राचे सर्वच कौतुक करतात. पण अमावस्येच्या चंद्राला सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व असते हे दाखवतो सूर्यग्रहणाचा दिवस. आणि आजच्या या दिवशी 14 लक्ष किलोमीटर व्यासाच्या सूर्याला अगदी छोटासा म्हणजे 34 हजार किलोमीटर व्यासाचा चंद्र झाकून टाकणार आहे.
हे सूर्यग्रहण नेमके कसे होते हे पाहता सूर्य पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तिन्ही खगोल एका सरळ रेषेत व समपातळीत असणे आवश्यक असते ते एका सरळ रेषेत असताना दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथील लोकांना सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली दोन प्रकारे पडते मध्य भागात दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याचवेळी विरळ छायेतील भागातून सूर्य बिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यग्रहण अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येत काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही .
ती आकाशातच संपते अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते ते कंकणाकृती सूर्यग्रहण होय. आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता नंदुरबारच्या अक्षवृत्तीय विस्तार 21.42 उत्तर अक्षांश तर रेखावृत्तीय विस्तार 74.26 पूर्व रेखांश आहे आपण नंदुरबार कर आज खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेऊ शकलो.  सूर्य फक्त 25% ग्रासलेला आपल्याला दिसला, नक्षत्र छंद मंडळातर्फे अनेक विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला.. मंगळवारी दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली व 6 वाजून 5 मिनिटापर्यंत हे ग्रहण आपण पाहू शकलो. जवळजवळ एक तास वीस मिनिटं हे ग्रहण आपल्याकडे दिसू शकलं.
सूर्यास्तामुळे आपल्याला हे ग्रहण अधिक काळ पाहता आले नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण असल्याकारणाने सर्व ठिकाणी हे कमी अधिक प्रमाणात दिसले.
भारतातून दिसणारे हे शेवटचे सूर्यग्रहण आहे .त्यानंतर 2 ऑगस्ट 2027 रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे पण पावसाळा असल्याने दिसण्याची शक्यता कमी आहे. मात्र उत्साहाच्या भरात उघड्या डोळ्यांनी व असुरक्षित साधनांनी वारंवार सूर्याकडे पाहिले तर तुमचे डोळे कायमचे रिकामी होऊ शकतात. सूर्याकडून येणाऱ्या अवरक्त व अतिनील किरणे दृष्टीपटलावर पडून ती कायमची निकामी होण्याची शक्यता वाढते. सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी दुर्बीण कॅमेरा यातून कधीही ग्रहण पाहू नये. काळी काच, काळा गॉगल, एक्स-रे फिल्म, चंदेरी रंगाच्या ॲल्युमिनियम फिल्टरचे गॉगल, यामुळे सूर्यकडून येणारे हानिकारक किरणे थेट आपल्या डोळ्यांवर पडून आपले डोळे न गमावण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.
सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहाल?
यासाठी आशापुरी फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या नक्षत्र छंद मंडळाने आय.एस.ओ.  आंतरराष्ट्रीय मानांकन 12312-2:2015 अनुस्वार बनवलेल्या फिल्टर गॉगल मधूनच सूर्यग्रहण पाहिले. सुरक्षित फिल्टर मधून सूर्य नारंगी रंगाचा दिसला.याप्रसंगी आशापुरी फाउंडेशनचे संस्थापक दिनेश पाटील, नक्षत्र छंद मंडळाच्या संचालिका चेतना  पाटील, हनुमंत पाटील, हर्षा पाटील, स्नेहल अहिरे,दुर्गा परदेशी, अमोल परदेशी, ,हनुमंत पाटील,अर्णव, आर्या,वेदिका, गौरेश ,श्रेयांक , रीयांश, रिदम,प्रीती आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी फराळ वाटप

Next Post

धक्कादायक बातमी : सुतळी बॉम्ब फोडताना १४ वर्षीय बालकाचा मृत्यू

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक बातमी : सुतळी बॉम्ब फोडताना १४ वर्षीय बालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add