नंदुरबार l
तालुक्यातील ढंढाणे गावाजवळ दुचाकीने ॲपेरिक्षाला धडक दिल्याने ॲपेरिक्षा घडलेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला तर एक युवती जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे गावाजवळील रनाळे ते शनिमांडळ टी-पॉईंटजवळील रस्त्यावर साहेब काशिनाथ ठाकरे रा.ढंढाणे ता.नंदुरबार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या ॲपेरिक्षाला (क्र.जी.जे.०८ एव्ही ३९७७) जबर धडक दिल्याने ॲपेरिक्षा उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात आनंदी सोमा पाडवी (वय १९, रा.ढेकवद ता.नंदुरबार) ही तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
तर नंदिनी सोमा पाडवी (वय १५, रा.ढेकवद ता.नंदुरबार) ही युवती जखमी झाली. अपघातात ॲपेरिक्षाचे नुकसान झाले असून अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सोमा बाज्या पाडवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात साहेब ठाकरे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन काायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेश गुरव करीत आहेत.








