Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी किट वाटप

team by team
October 23, 2022
in राजकीय
0
नंदुरबार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी किट वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त अन्न व नागरी पुरवठा मार्फत वितरित करावयाचे दिवाळी किट नंदुरबार तालुक्यास प्राप्त झालेले असून पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार शहरातील लाभार्थ्यांना दिवाळी कीट वितरण करण्यात आली.

 

यावेळी खा.डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,नायब तहसीलदार रमेश वळवी, नायब तहसीलदार श्री. बोरसे, पुरवठा निरीक्षक श्रीमती चौरे, अव्वल कारकून रवी घोडसे , मंडळ अधिकारी मदन कावळे, प्रशांत देवरे उपस्थित होते.पात्र शिधापत्रिकाधारक यांना प्रतिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आली.तहसील कार्यालयाजवळील ५ रेशन दुकानदार यांचे १२५ लाभार्थ्यांना दिवाळी किट वाटप करण्यात आले.सदर दिवाळी किटमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर तेल अशा चार वस्तू असून त्यांची किंमत १०० रुपये आहे .

 

 

 

 

शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.लवकरात लवकर सर्व गावांमध्ये सर्व कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरीत करण्यासाठी पुरवठा विभाग मेहनत घेत आहे.आज पर्यंत एकूण १८७ दुकानांपैकी १५३ दुकानात वाटप सुरू असून उशिरापर्यंत सर्व दुकानात वाटप सुरू करण्यात येईल,तसेच ई पॉज मशीन मध्ये तांत्रिक अडचण आल्यास ऑफलाइन देखील वाटप करण्याची मुभा रेशन दुकानदार यांना देण्यात आलेली असून एखादी वस्तू विलंबाने दुकानापर्यंत पोहोचत असल्यास दुकानातील प्राप्त झालेल्या वस्तू तातडीने शिधापत्रिकाधारक यांना वितरित करण्याच्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत.

 

 

 

 

यावेळी शासकीय दिवाळी थेट व्यतिरिक्त तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने उपस्थित विधवा भगिनी तसेच बालगोपाळांना मिठाईचे वाटप करण्यात आले.मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे अडचणीत आलेल्या देहविक्री करणार्‍या महिलांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात आले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पोलीसांची अनाथ मुलांसोबत आगळी वेगळी दिवाळी

Next Post

दुचाकीची ॲपेरिक्षाला धडक ; तरुणीचा मृत्यू तर एक युवती जखमी

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

दुचाकीची ॲपेरिक्षाला धडक ; तरुणीचा मृत्यू तर एक युवती जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add