Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’ साजरा करणार

team by team
October 20, 2022
in राज्य
0
राज्यात १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’ साजरा करणार

मुंबई  l

बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात ‘बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.

आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधव, मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, युनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी सायली मोहिते आदी उपस्थित होते.

बाल सप्ताहाविषयी माहिती देतांना श्रीमती शहा म्हणाल्या की, बाल दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी ‘बाल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. बालकांसाठी ‘राईट टु प्ले’ (खेळण्याचा अधिकार) हा या सप्ताहाची संकल्पना (थीम) असणार आहे. हा सप्ताह युनिसेफच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे. राज्यातील बालकांच्या विशेषत: बालगृह आणि सीसीएफच्या मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या बालकांमध्ये खेळाबाबत प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांना संधी देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘बाल सप्ताह’ कार्यक्रम राबवून मुलांसाठी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे श्रीमती शहा यांनी सांगितले.

बाल सप्ताहाच्या माध्यमातून मुलांना चांगली संधी मिळेल. राज्यातील मुलांसाठी एकत्र मिळून बालस्नेही महाराष्ट्र घडवू या, असे आवाहनही आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शहा यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटींची कर्जमाफी; कर्मचाऱ्यांना देखील मोठा दिलासा

Next Post

कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add