शहादा l प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने नदी संवाद यात्रे अंतर्गत लोणखेडा ता. शहादा येथे गोमाई नदीचे जलपूजन करण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्याचे नियोजन आहे. जल बिरादरीचे प्रा. राजेंद्र सिंह यांच्यासह विविध संस्थांच्या सहकार्यातून राज्यात नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील व शैक्षणिक-प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत शनिवारी लोणखेडा येथील गोमाई नदीचे जलपूजन करण्यात आले.
गोमाई नदीपात्रात नदी संवाद तथा जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील, जायण्टसचे अध्यक्ष सतीश जव्हेरी,माजी अध्यक्ष प्रा.भूषण बाविस्कर, ज्येष्ठ नागरिक संघाचे के.के. सोनार, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर, पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश आदींची उपस्थिती होती. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक गुणवंत पाटील यांनी जलसंवर्धनाबाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.राजेंद्र पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ. वर्षा चौधरी यांच्या सह रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.








