शहादा ।
शहरातील वार्ड क्र १ मधील मुरली मनोहरसह पसिरात कॉलनीमध्ये विविध समस्या असून त्या तत्काळ सोडविण्यात याव्यात , अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शहादा नगरपालिका व पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुरली मनोहर, जय भोले नगर, किरण टॉकीज, श्रीराम चौक, जॅकवेल रोड आदी कॉलनीत अनेक भागात रस्त्यांवर स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते त्यामुळे या परिसरात चोरट्यांचा वावर असतो रात्रीच्या सुमारास घरफोडी तसेच महागडी दुचाकी वाहने चोरी जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
तसेच नागरिकांना रात्री – बेरात्री अज्ञात चोरट्यांमुळे रहिवाशांच्या जीवालाही धोका असून खेतिया – लोणखेडा रस्त्यावर एक पोलीस चौकी उपलब्ध करून द्यावी तसेच कॉलनीत ओपन स्पेससाठी जागा सोडण्यात आली आहे मात्र या ठिकाणी संबंधित प्रशासनाने अद्यापपर्यंत सुशोभित केली नसून या ठिकाणी काटेरी झुडप्यांच साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच याच कॉलनीतील जीवनधारा जवळील गटार देखील गेल्या अनेक दिवसांपासून दुरस्त न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
तरी संबंधित विभागाने या ठिकाणी वृद्ध नागरिकांना व बालकांना मनोरंजनासाठी परिसरात करून साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेद नमूद करण्यात आली आहे. यावेळी रहिवाशांनी शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे व शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर नरसिंग गादागोणीवार, हेमराज पाटील , ईश्वर पाटील, माधव पाटील, देवा बोराणे, सुरेश पाटील,सुदाम पाटील,रोहित पाटील, रतन देवरे,रमेश बोराणे, राहूल मराठे, अविनाश पाटील,विजय पाटील, जितेंद्र पाटील, नवनीत पटेल,रवींद्र पाटील,नितीन सूर्यवंशी, सुनील वाघ,संतोष राठोड, हिरालाल चौधरी , सुदाम सोनवणे, एन. एन.पानपाटील, पटेल आदींच्या सह्या आहेत.








