नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यात ८१ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती.यामध्ये बिलबारा ग्रामपंचायतीतील अन्य उमेदवारांनी सरपंच व सदस्य पदाची उमेदवारी मागे घेतल्याने बिलबारा गावातील ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने बिलबारा ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याची माहीती तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत यांनी दिली आहे.या प्रसंगी नवापूर तालुका कॉग्रेस भवन येथे बिलबारा ग्रामपंचायतीचे सरपंच उमेदवार कौशल्या सुरेश पाडवी,सदस्य सुदाम दासु वळवी,उर्मिला महेंद्र वळवी,गुलाबसिंग धिमाजी वळवी,सुरेश बाज्या पाडवी,मिना तुकाराम पाडवी,प्रतिमा दिलीप पाडवी,रजनी हेमु वसावे,राजु पोसल्या गावीत,इलामती दिलीप वळवी यांची बिनविरोध निवड होणे निश्चित झाले आहे. काही दिवसातच अधिकृत घोषणा करण्यात येईल.
सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार यांचा कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत,दिलीप पवार,बाळु गावीत, हर्षल गावीत यांनी त्यांच्या सत्कार केला.
नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वात ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.तसेच महेंद्र वळवी, उर्मिला वळवी यांच्या सहकार्यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.








