नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर येथील खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या टी २० क्रिकेट सामन्यात निवड करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर येथे राहणाऱ्या खेळाडू ची नुकतीच महाराष्ट्र राज्य मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राज्यातून होणाऱ्या निवड चाचणीतून मुंबई संघासाठी सातपुड्याच्या पायथ्यातील असणाऱ्या आशिष सुधाकर पाडवी या खेळाडूची निवड झाली असुन तो नंदूरबार जिल्ह्यातील अशी निवड होणारा क्रिकेट सामण्यासाठी ग्रामीण भागातील एकमेव खेळाडू आहे.
इंडियन नॅशनल क्रिकेट लीग व युएई कॉर्पोरेट लीग याच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे कॉर्पोरेट टी २० टुर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे. आय. एन. सी. एल. युएई कॉर्पोरेट आणि बेटी बचाओ या ट्रॉफी साठी त्याची निवड झाली आहे.
हा खेळाडू १ ऑक्टोबर ला दिल्ली येथे रवाना होत असून तो लागलीच तिथून दुबई येथे जाणार आहे.दुबई येथे ७ ऑक्टोबर २०२२ ते १७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या सामन्यात तो खेळणार आहे.
दुबई येथे जाण्यासाठी लागणाऱ्या पासपोर्ट संदर्भात तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश पाडवी यांनी त्याला मार्गदर्शन केले असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अवघ्या तीन दिवसात त्याचा पासपोर्ट तयार करण्यात आला आहे.
त्याच्या या अचंबित करणाऱ्या निवडीबद्दल आदिवासी विकास विभाग तळोदा येथील प्रकल्प अधिकारी डॉ.मैनाक घोष यानी या खेळाडूचा सत्कार केला आहे.
त्याचबरोबर गावकरी तसेच शहादा, तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आकाश वळवींसोबत या खेळाडूची भेट घेतली असून त्यांचे अभिनंदन ही केले आहे.तसेच पुढील वाटचालीस मदतीचे आश्वासनही दिले आहे.








