Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृतांची संख्या झाली 6

team by team
October 1, 2022
in क्राईम
0
आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृतांची संख्या झाली 6
नंदूरबार l प्रतिनिधी
मजुरांना रोजगारासाठी घेऊन जाणार्‍या आयशर ट्रक व लक्झरी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच तर १७ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२९ सप्टेंबर रोजी शहादा बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत घडली होती.  याशिवाय एका गंभीर जखमी झालेल्या बालिकेला शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिची मृत्यूशी झुंज अखेर निकामी ठरली तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू नंतर उपचारा दरम्यान बालिकेचा ही मृत्यू झाला.
शहादा तालुक्यातून रोजगारसाठी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. आजदेखील पाडळदा व अलखेड येथून पुणे येथे मजुरांना घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.१८ एए -९८५३) व शेल्टी, शिरूड, कवळीथ, टेंभा गावातून मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी लक्झरी (क्रमांक जीजे ०३ एएक्स०१९८) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
शहादा शहराबाहेरून जाणार्‍या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला. त्यावेळी परिसरात प्रचंड मोठा आवाज झाल्याने मदतीसाठी अनेक जण धावून आले. अपघातात आयशर ट्रकमधील मजूर लांब अंतरापर्यंत फेकले जाऊन अनेक जण गंभीर जखमी झाले तर चार जण  ठार झालेत. त्यात तीन महिला व एक पुरुषाचा समावेश होता. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तर पाच वर्षीय अति गंभीर बालिका शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. या बालिकेची आई अपघातात मयत झाली होती. उपचारा दरम्यान उर्मिला किशोर भिल ही पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.त्यामुळे अपघातात मृतांची संख्या ६ झाली आहे
बातमी शेअर करा
Previous Post

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

Next Post

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

Next Post
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add