नंदूरबार l प्रतिनिधी
मजुरांना रोजगारासाठी घेऊन जाणार्या आयशर ट्रक व लक्झरी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच तर १७ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२९ सप्टेंबर रोजी शहादा बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत घडली होती. याशिवाय एका गंभीर जखमी झालेल्या बालिकेला शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिची मृत्यूशी झुंज अखेर निकामी ठरली तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू नंतर उपचारा दरम्यान बालिकेचा ही मृत्यू झाला.

शहादा तालुक्यातून रोजगारसाठी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. आजदेखील पाडळदा व अलखेड येथून पुणे येथे मजुरांना घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.१८ एए -९८५३) व शेल्टी, शिरूड, कवळीथ, टेंभा गावातून मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी लक्झरी (क्रमांक जीजे ०३ एएक्स०१९८) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
शहादा शहराबाहेरून जाणार्या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला. त्यावेळी परिसरात प्रचंड मोठा आवाज झाल्याने मदतीसाठी अनेक जण धावून आले. अपघातात आयशर ट्रकमधील मजूर लांब अंतरापर्यंत फेकले जाऊन अनेक जण गंभीर जखमी झाले तर चार जण ठार झालेत. त्यात तीन महिला व एक पुरुषाचा समावेश होता. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तर पाच वर्षीय अति गंभीर बालिका शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. या बालिकेची आई अपघातात मयत झाली होती. उपचारा दरम्यान उर्मिला किशोर भिल ही पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.त्यामुळे अपघातात मृतांची संख्या ६ झाली आहे








