Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

team by team
October 1, 2022
in राज्य
0
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

मुंबई  l 

 

 

महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

 

 

 

विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येईल. 2 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना व्हीडिओ संदेशाद्वारे संबोधित करून स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय करून देतील.

 

 

 

त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेटस् चेंज’ हा 75 मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मनोरंजनात्मक चित्रपट प्रसारित केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींच्या व्हीडिओ संदेशाद्वारे देखील कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.

 

 

 

या उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ झालेले विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून देतील. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार प्रसार झाल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांमध्ये सुधारणा होऊन परिसर स्वच्छ राहील तसेच सफाई कर्मचाऱ्यांवरील भार देखील कमी होईल. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छता मॉनिटर’ यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा रुग्णालयातर्फे माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत सप्ताहनिमीत्त प्रभातफेरी

Next Post

आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृतांची संख्या झाली 6

Next Post
आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृतांची संख्या झाली 6

आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृतांची संख्या झाली 6

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add