नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांतर्फे
अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रिया,एच.यु.आय. डी. च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील HUID ची तरतुद रद्द करण्यात यावी.ही मागणी करत त्याचा विरोध म्हणुन दि. २३ ऑगस्ट सोमवार रोजी जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी बंधु हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळणार आहेत.
याबाबत महाराष्ट राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन,
नंदुरबार जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे निवेदन प्रसिध्दीस देण्यात आले.त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनम्र निवेदन.नंदुरबार सराफ असोसिएशन तर्फे सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी,सर्व सराफी दुकान बंद ठेवण्यात येणार आहे.
अव्यवहारिक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रिया,HUID च्या क्लिष्ट व जाचक तरतुदी आणि अनेक कारकुनी व्याप वाढणार असल्याने या कायद्यातील HUID ची तरतुद रद्द करण्यात यावी. त्याचा विरोध म्हणुन हा बंद पुकारण्यात येत आहे.
HUID च्या तरतुदीमुळे आमच्या ग्राहकांना देखिल संपुर्ण जाचक तरतुदीला सामोरे जावे लागणार आहे.सुवर्ण व्यापारी बंधुंचा हॉलमार्किंग ला विरोध नाही परंतु त्या बाबत ज्या अडचणी व क्लिष्ट तरतुदी आहेत त्या गोष्टीला विरोध आहे. आम्हा सर्व बंधुंचा वस्तुंच्या गुणवत्तेबद्दल विरोध नाही पण त्या राबवण्याच्या प्रणालीस विरोध आहे.त्यात योग्य तो बदल करून सर्वांना त्याची अंमलबजावणी साधी सोपी कशी होईल याचा संबंधित विभागाने विचार करावा हे लक्षात आणुन देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी बंधु हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळणार आहेत.याची संपूर्ण जिल्हावासीयांनी नोंद घ्यावी आणि असोसिएशनला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष मनोज श्रॉफ, उपाध्यक्ष जगदीश सोनी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.