नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार- वाका चार रस्त्यावर आयसर चालकाचे हातपाय बांधत वाहनचालकासह दोघांना मारहाण करत कापडाच्या २१८ गठाणासह सुमारे २० लाखांची लुट करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर लुट करणारे चौघेही मुद्देमाल घेवून पसार झाले.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील रहिवासी किशोर संतोष पाटील हे आपले आयसर ट्रक (क्र.एम.एच.१८.बी.जी. ७४४७) मध्ये अहमदाबाद येथुन कापडाचा गठाण भरून अमरावतीकडे निघाले होते. आयसर वाकाचार रस्त्यावरून पुढे नंदुरबार रस्त्यावर आली असता रात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात मालट्रक त्यांच्या आयसर समोर आडवा लाण्यात आला. त्यानंतर ट्रकमधील एकाने खाली उतरत आयसरचा काच फोडत शिवीगाळ करून तु पिछे एक को मारके आया है, असे सांगत दोन जण आयसरच्या कॅबीनमध्ये चढले, त्यापैकी एकाने वाहनचालक संजय मच्छिंद्र पाटील याच्या हातावर खांद्यावर मारहाण केली. मारहाण होत असतांना गाडी मालक किशोर पाटील झोपेतून उठले असता त्यांचेही हातपाय बांधून चिल्लाये तो जानसे मार दुंगा असा दम देत दोघांनाही बाजुला केले. चौघांपैकी एकाने आयसर गाडी चालवून अज्ञात ठिकाणी घेवून गेले. पुढे काही अंतरावर चौघा अज्ञातांना आयसरमधील १२८ कापडाच्या गठाण आपल्या ट्रकमध्ये जबरीने घेवून गेले तसेच गाडीमालक किशोर पाटील यांच्या पॅन्टच्या खिशातून ८ हजार ५०० रूपयांची लुट केली. त्यानंतर गठाणीसह चौघांनीही पोबारा केला. पहाटे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अनवेषण शाखाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्ष्क संदिप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आयसर उपनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. आयसर चालक संजय मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघा अज्ञातांविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९४, ३४१,३४२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील करीत आहेत.