नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र मंत्रीमंडळात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचा समावेश झाल्यानंतर नंदुरबार जिल्हयात मंत्री झाल्यानंतर प्रथमच आज दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता येणार असुन या निमित्त ना.डॉ.विजयकुमार गावित यांचा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य स्वागत केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे.
आज दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. याच अनुषंगाने स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असुन धुळे चौफुली येथुन मोठा मारुती मंदिर, मोठा मारुती मंदिर तेथुन दादा गणपती, चैतन्य चौक, जळका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, हुताम्का स्मारक, दिनदयाल चौक मार्गे ना.डॉ.विजयकुमार गावित आपल्या निवासस्थानी पोहचणार आहे.
या दरम्यान ते नागरीकांना अभिवादन करुन स्वागत स्वीकारणार आहे. जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मोर्चा आघाडी अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख आदी व सर्वसामान्य नागरीक यांनी स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे. अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.