Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 75 पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन

team by team
August 12, 2022
in राज्य
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 75 पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सवाच्यानिमित्ताने व स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील 75 गावांमध्ये पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ पशुवैद्यक अधिकारी पशुपालकांना मार्गदर्शन व पशुंची तपासणी करणार आहेत. या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

या शिबीरात पशुंची आरोग्य तपासणी, औषधोपचार, आवश्यक तेथे शस्त्रक्रिया, गो-ह्यांचे खच्चीकरण, गाई म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार, गर्भ तपासणी, शेळ्या मेंढ्यांचे जंत निर्मूलन इ. सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात आजपासून सुरु झालेले हे शिबिर 18 ऑगस्ट, 2022 पर्यंत चालणार असून तालुकानिहाय शिबीर पुढील प्रमाणे असेल.

12 ऑगस्ट नवापूर तालुक्यातील रोजी कोठाडा, बिलबारा, खातगाव, पांघरण, खेकडा, भरडू, आमपाडा तर 17 ऑगस्ट रोजी घोगलापाडा व विजापूर येथे शिबीर होईल.

शुक्रवार 12 ऑगस्ट, 2022 रोजी तळोदा तालुक्यातील तळोदा, लाखापूर, पडाळपूर, शेलवाई, रेवानगर तर नंदुरबार तालुक्यात याच दिवशी रनाळे खु,निंबेल, धमडाई, कोळदा, रनाळा, चाकळे.

शनिवार 13 ऑगस्ट रोजी बोराळा, शनिमांडळ, खोंडामळी, तर 15 ऑगस्ट रोजी भालेर, उमर्दे ब्रु. येथे 16 ऑगस्ट रोजी वावद, 17 ऑगस्ट रोजी दहिदुले, जैताणे, नादरर्खे, न्याहळी, खामगाव येथे.

धडगाव तालुक्यात 12 ऑगस्ट कुकतार, 13 ऑगस्ट धनाजे, 14 ऑगस्ट शेलकुई, 15 ऑगस्ट सिसा, 16 ऑगस्ट खामला, 17 ऑगस्ट वरखेडी, 18 ऑगस्ट गोरंबा येथे होईल.

 

शहादा तालुक्यात 12 ऑगस्ट रोजी जयनगर, सुलवाडे, फेस, टेंभा, नागसरी, वडगाव, खरगोन, 13 ऑगस्ट रोजी करजई, कळंबू, वरुळ कानडी, पाडळदा, तितरी, काकरदा 14 ऑगस्ट रोजी भादे येथे.

 

अक्कलकुवा तालुक्यात 12 ऑगस्ट पोरंबी, 13 ऑगस्ट सिंगपूर खु , 14 ऑगस्ट आमली, 15 ऑगस्ट जुगलखेत, 16 ऑगस्ट नवानागरमुठा, 17 ऑगस्ट दिगीअंबा, वालंबा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १२ ऑगस्ट रोजी नंदूरबार येथे पदयात्रा

Next Post

आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

Next Post
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add