Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

team by team
February 28, 2026
in शैक्षणिक
0
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी-

भादवड ता. नंदुरबार येथील नं. ता. स. संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत बलदाणे व झिरवे येथून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील शिंदे तर प्रमुख पाहुणे मा. सरपंच हसरत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष पाटील, माजी उपसरपंच उखा पाटील होते. कार्यक्रमास गावातील ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी मुरलीधर पाटील , बलदाणे गावाचे सरपंच भटू पाटील भादवड ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य , पालक प्रतिनिधी भटेसिंग गिरासे इंद्रसिंग गिरासे नारायणसिंग गिरासे, अशोक पाटील, मनोज गिरासे, गोपाल पाटील, सचिन पाटील, मदन पाटील, प्रमोद पाटील, अजबसिंग गिरासे, पंडित पाटील तसेच झिरवे व बलदाणे येथील पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय जी. टी. बापूजी, स्वर्गीय बटेसिंहजी रघुवंशी, विमलताई रघुवंशी, स्वर्गीय गो. स. मराठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीता द्वारे शब्द सुमनांनी स्वागत केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यालयात शिकणाऱ्या झिरवे व बलदाने येथून ये जा करणाऱ्या पात्र विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक व सूत्रसंचालन टी.जी.पाटील यांनी केले. मुख्याध्यापक ए. बी. पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती आपल्या भाषणातून पालकांसमोर मांडली. विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून हर्षदा गिरासे हिने शासनाचे आभार मानले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार एच .एस. साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

Next Post

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

Next Post
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add