नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेनाप्रमुख , पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत .यात
शहादा , नंदुरबार विधानसभा जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे तर अक्कलकुवा , नवापूर विधानसभा
जिल्हा युवा अधिकारी म्हणून ललित जाट यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.
या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील , असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले आहे .यात जिल्हा युवा अधिकारी अर्जुन मराठे ( शहादा , नंदुरबार विधानसभा ) , जिल्हा युवा अधिकारी ललित जाट ( अक्कलकुवा , नवापूर विधानसभा ) , जिल्हा समन्वयक विजय माळी ( नंदुरबार विधानसभा ) , रोहित चौधरी ( अक्कलकुवा विधानसभा ) , जिल्हा चिटणीस योगेश पाटील ( अक्कलकुवा विधानसभा ) , उपजिल्हा युवा अधिकारी – गोपाळ भंडारी ( शाहदा विधानसभा ) , दिनेश सारोटे ( नवापूर विधानसभा ) , सचिन पाडवी ( अक्कलकुवा विधानसभा ) ; तालुका युवा अधिकारी – समाधान पाटील ( नंदुरबार तालुका ) , सुजीत पावरा ( शाहदा तालुका ) , कल्पेश सूर्यवंशी ( तळोदा तालुका ) , वीर बहादुर सिंह ( अक्कलकुवा तालुका ) , नरेंद्र गावीत ( नवापूर तालुका ) , मुकेश वाहरीआ वळवी ( धडगाव तालुका ) यांची निवड करण्यात आली आहे.