नंदुरबार ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नागझरी गावातील नागरिकांनी नागझरी येथील रंगावली मध्यम प्रकल्प धरणाची उंची वाढविण्यात येणार असून त्यामुळे मोठ्या माणात नागरिकांना विस्थापित केले जाणार असल्याचे सोशल मीडियावर मॅसेज बाबत खुलासा करावा. व अफवा पसरवणाऱ्या विरूद्ध कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,नागझरी ता.नवापूर ग्रामस्थ आपणाकडे विनती करतो की, बी.टी.पी , तालुका अध्यक्ष राहुल गावीत यांनी सोशल मीडियावरील व्हॉटसअपवर इंडिजिनिअस म्हणून फोटो व माहिती प्रदर्शित केलेली आहे . यात नागझरी येथील रंगावली धरणाची उंची वाढविली जाणार आहे.व त्यामुळे नागझरी गांव देखील उठविले जाणार आहे . गावाचा संपर्क कायमचा तुटणार आहे.अशी माहिती प्रकाशित केलेली आहे . या संदेशामुळे गावातील लोक भयभीत झालेले आहेत . तरी याबाबत योग्य ती चौकशी होऊन राहुल गावीत यांनी प्रकाशित केलेला संदेश योग्य आहे की लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी सदरचा संदेश टाकलेला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी. सदरची माहिती चुकीची निघाल्यास संबंधित व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा नोंद करण्यात यावाअशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्रामस्थ करसन लालजी गावीत, हरिष देवल्या गावीत, रविंद्र बारक्या गावित, कर्मा गावजी गावीत, संदिप पंडीत गावीत, प्रकाश कालिदास गावीत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान नवापूर तालुक्यातील नागझरी गावातील नागरिकांनी निवेदन दिले असून त्या निवेदनात ग्रामीण भागात सोशल माध्यमांमध्ये पुढीलप्रमाणे अफवा पसरत असल्याचे नमूद केले आहे . नागझरी येथील रंगावली मध्यम प्रकल्प धरणाची उंची वाढविण्यात येणार असून त्यामुळे मोठ्या माणात नागरिकांना विस्थापित केले जाणार असल्याचे तसेच सदर भागाचा संपर्क कायमचा तुटणार असल्याचे सदर संदेशात नमूद करण्यात आले आहे . सदरचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले असल्याचे नमूद आहे . तथापि सदरचा व्हायरल झालेला संदेश चुकीचा असून रंगावली धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव शासन स्तरावर सुरु नाही . तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.