नंदुरबार | प्रतिनिधी
सुरत भुसावड रेल्वे लोह मार्गावरील महालकडु ते चिंचपाडा रेल्वे फाटक दरम्यान रेल्वे चा पट्टा ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश कृष्णा वसावे (वय २३) रा महालकडु ता नवापुर यांचे आई वडिल हे सुरत गुजरात राज्यात कामाला गेलेले होते पुतण्या शैलेश कृष्णा वसावे हा घरी एकटाच राहत होता व मी त्याचा घरा शेजारी राहतो . तसेच शैलेश कृष्णा वसावे यास दारु पिण्याचे व्यासन होते व तो दारुचे नशेत कुठेही निघुन जात असायचा. तो दि.१३ ते १४ मे दरम्यान सुरत भुसावड रेल्वे लोह मार्ग वरील महालकडु ते चिंचपाडा रेल्वे फाटक दरम्यान पोल क्र १२०/१० जवळ उत्तरेस रेल्वे चा पट्टा ओलांडतांना कोणत्यातरी येणार्या जाणार्या रेल्वेने त्याला धडक दिली.यात त्याला गंभीर दुखापत होवुन जागीच मयत अवस्थेत आढळुन आला.याबाबत त्याचे काका राजु चामु वसावे रा . महालकडु ता.नवापुर यांच्या खबरीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.